लोणावळा / वार्ताहर :
खंडाळय़ातील एका रिसॉर्टमध्ये देशी पोपट पिंजऱयात बंदिस्त करून ठेवल्याच्या प्रकरणात आरोपीस 25 हजार रुपये दंड व दहा झाडे लावण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
पी. टी. गिरीमोहन असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने स्वतःच्या खंडाळा मिस्टीका रिसॉर्टमध्ये एक देशी पोपट पिंजऱयात बंदीस्त करून ठेवला होता. ही माहिती वनविभागास कळताच वनविभागाने या रिसॉर्टमध्ये छापा टाकून पिंजरा व पोपट ताब्यात घेऊन गुन्हय़ाबाबत आरोपीवर गुन्हा नोंदवला होता. दोन वर्षांपूर्वी 2018 साली ही घटना घडली होती. या गुह्याबाबत आरोपी पी. टी. गिरीमोहन याच्यावर वडगाव मावळ न्यायालयात चार्जशिट दाखल केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए.मुळीक यांनी आरोपीला 25 हजार रुपये दंड व 10 आठ फुटी झाडे लावण्याची शिक्षा सुनावली.