प्रतिनिधी /पणजी
पोरस्कडे येथे कोकण रेल्वे पुला जवळील महामार्गावर रविवारी दुपारी कोरेगाव सातारा येथून आलेले पर्यटक व क्रिकेट खेळून कारने घरी परतणारे नईबाग येथील स्थानीक युवक यांच्यामध्ये झालेल्या राडय़ात नईबाग येथील संतोष नारायण स्वार (वय 21) हा गंभीर जखमी झाला आहे. स्थानीकांच्या एका कारची तर कराड येथील पर्यटकांच्या दोन टेंपो ट्रक्सच्या काचा फुटल्या.वाहनांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत कराडहून आलेले पर्यटक परत आपल्या गावी परत जात असता सावंतवाडी येथील पोलीसांनी चौकशीसाठी त्यांची तीन्ही वाहने ताब्यात घेउन नंतर पेडणे पोलीसांच्या ताब्यात दिली.
नईबाग येथील युवक तोर्से येथील क्रिकेट सामना आटोपुन घरी परतत होते.दुपारी पोरस्कडे येथील कोंकण रेल्वे पुला जवळील राष्ट्रीय महामार्गावर पोहचले असता तिथे दोन टेंपो ट्रक्स व एक कार थांबवून देशी पर्यटक मद्यधुंद अवस्थेत मार्गवरच नाचत होते.व दगडफेकही करत होते.याचवेळी नयबाग येथील क्रिकेट सामना आटोपून नयबाग येथील मुकेश पिळणकर यांच्या मालकिच्या कारने येणारी कार येथे पोहचली असता या पर्यटकांनी ती अडवली.तेव्हा कार मधील युवकांनी त्याना जाब विचरताच कार मधील संतोष नारायण स्वार या युवकाला त्यांनी कार मधून खेचून बाहेर काढले डोक्मयावर मागुन जवळून दगडाने काही वेळ प्रहार केला तसेच दंडुके मारले व पायावर चॅपर ओढला. त्यात संतोष गंभीर जखमी झाला.याच वेळी देशी पर्यटकांनी दगडफेक करून काचा फोडल्या .
पण देशी पर्यटकही मोठय़ा संख्येने होते.
तर यावेळी नईबाग येथील युवकांनीही प्रतिकार केला. त्यात कोरेगाव सातारा येथील तिन्ही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याया घटने नंतर हे देशी पर्यटक कोरेगाव सातारा येथील पर्यटक आपल्या गांवी पळून जात असता सावंतवाडी पोलीसांनी या वाहनांची स्थिती पाहून ताब्यात घेतली व पेडणे पोलीसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी पेडणे पोलीसांनी कोरेगाव सातारा येथील विनय पोपट, आकाश येवळे,जीवन नाना येवळे,अशोक रघुनाथ येवळे ,अश्विन भारत येवळे,संकल्प कुमार येवळे,प्रफुल्ल विशाल येवळे, सुरज राजेंद्र सबकाळ.अनंतराव प्रल्हाद सबकाळयांच्या विरोधात पेडणे पोलीसांनी गुन्हा नोंद केला असुन पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक वायंगणकर पुढील तपास करत आहेत.