पोरगं अध्याप गायब ; अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; तीन महिलांना अटक
प्रतिनिधी /सातारा
शहरातील एका अल्पवयीन मुलीला संशयित जया अभिजीत पवार यांनी घरी बोलवून मानसपुत्र संशयित महेश सोनवणे (वय 22 वर्ष) यांच्याशी लग्न कर म्हणत त्यांच्या अंगावर ढकलून दिले. महेश यांने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने त्यांच्यासह आणखी तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीला संशयित जया अभिजीत पवार यानी घरी बोलवून घेतले. यावेळी घरी त्यांचा मानसपुत्र महेश सोनवणे होता. जया यानी मुलीला महेश याच्याशी लग्न कर असे म्हणत तिला इच्छा नसताना महेशच्या अंगावर ढकलून दिले. यावेळी मुलीने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महेशने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. यावेळी मुलीच्या आईने जया याच्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला मात्र तुला काय करायचे ते कर असे म्हणत दमदाटी केली. पतीला फोन केला म्हणून चिडून जावून जया पवार, कोमल पवार व उज्वला पवार यांनी मुलीच्या आईला घरी जावून शिवीगाळ, मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीच्या आईने या पाच जणांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात जया पवार, कोमल पवार, उज्वला पवार यांना अटक केली आहे. यातील दोन महिला पुण्यातील आहेत तर महेश सोनवणे पुण्यात असून त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.