वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक नजीक आल्याने आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. पोर्टलँडमधील हिंसाचारावरून आता राजकारण सुरू झाले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार ज्यो बिडेन परस्परांना या हिंसाचारासाठी जबाबदार ठरवत आहेत. आग पेटली असून आमच्या देशाचा अध्यक्ष आगीच्या ज्वाळांना भिडण्याऐवजी त्या पाहणे पसंत करत असल्याचे उद्गार बिडेन यांनी काढले आहेत. हिंसा आणि विनाशाची ही लाट बहुतांशी बिडेन यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील प्रांतामध्ये दिसून आली आहे. डेमोक्रेटिक पक्ष आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. दंगलखोर आणि बिडेन एका बाजूला असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.