वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो ऍक्शन टीमचे चार भारतीय सायकलपटू पोर्तुगालमध्ये होणाऱया अल्ग्रेव्ह माऊंटन बाईक चॅलेंज शर्यतीत भाग घेण्यासाठी जाणार आहेत. 7 फेब्रुवारीपासून ही शर्यत सुरू होणार आहे.
युसीआय कॅटेगरी 2 च्या या माऊंटन बाईक सायकलिंग रेसमध्ये जगभरातील अनेक नामवंत सायकलपटू भाग घेणार आहेत. 16 देशांतील 1100 हून अधिक सायकलपटू त्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. हिरो ऍक्शन सायकल टीमध्ये सदस्य असलेले अक्षित गौर (20), आशिष शेर्पा (18), आकाश शेर्पा (22), डेव्हिड कुमार (25) अशा दोन जोडय़ा त्यात भाग घेतील.