यूथेनेशिया- राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच 7 वा देश ठरणार
पोर्तुगालच्या संसदेने यूथेनेशिया म्हणजेच इच्छामरणाल कायदेशीर मान्यता देणारे विधेयक संमत केले आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ 136 तर विरोधात 78 मते पडली आहेत. हे विधेयक आता मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येईल. त्यांची स्वाक्षरी होताच याला कायद्याचे स्वरुप प्राप्त होणार आहे. तसेच इच्छामरणाला वैध ठरविणारा पोर्तुगाल हे युरोपमधील चौथा तर जगातील 7 वा देश ठरणार आहे.
कॅथोलिक धर्माच्या अनुयायांनी संसदेच्या या पावलाला विरोध दर्शविला आहे. कॅथोलिक हा पोर्तुगालमधील सर्वात मोठा पंथ आहे. याचबरोबर 12 खासगी आरोग्य सेवा संस्थांनीही इच्छामरण रोखण्याचे आवाहन राष्ट्रपतींना केले आहे.
इच्छामरणाच्या अटी..
संबंधित व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असायला हवे.
गंभीर जखम किंवा उपचार शक्य नसलेला घातक आजार असावा.
असहय़ वेदना होत असाव्यात आणि तो पूर्ण शुद्धीत असावा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच संबंधिताला इच्छामरण देता येणार.
डॉक्टर तसेच परिचारिका इच्छामरणाला नकार देऊ शकतात.
अशा स्थितीत राष्ट्रपतींकडून इच्छामरणाची अनुमती मागता येणार.
राष्ट्रपती नकाराधिकार वापरू शकतात, न्यायालयाला सोपवू शकतात.
इच्छामरण वैध
नेदरलँड्स, बेल्जियम, कोलंबिया, लक्झेम्बर्ग, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात ऍक्टिव्ह यूथेनेशियाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. ब्रिटनसमवेत युरोपचे अनेक मोठे देश याच्याविरोधात आहेत.