वृत्तसंस्था/ मुंबई
जर्मनीमधील लक्झरी स्पोर्ट्स कारची निर्मिती करणारी कंपनी पोर्शे इंडियाने मागच्या वषीच्या दरम्यान कार विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ दर्शवली आहे. वर्ष 2021 मध्ये कंपनीने 62 टक्के वाढीसह 474 कार्सची विक्री करण्यात यश मिळवलं आहे.
या विक्रीमध्ये स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल मकॅन कारचा वाटा 39 टक्के इतका आहे. वाहनांची वाढती मागणी लक्षात घेत त्याचप्रमाणे नव्या उत्पादनांच्या माध्यमातून यावषीही विक्रीमध्ये कंपनीकडून जास्तीत जास्त वृद्धी दर्शवली जाईल असेही कंपनीने म्हटले आहे. 2021 मध्ये 474 वाहनांची विक्री करण्यात आली असून 2014 नंतरचा हा विक्रीतला विक्रम असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे 2021 मध्ये पोर्शे इंडियाच्या ऑर्डरमध्ये जवळपास 165 टक्के अधिक वाढ दर्शवली गेली आहे. हाही एक प्रकारचा विक्रम मानला जात आहे.