वृत्तसंस्था/ मियामी
एटीपी टूरवरील येथे झालेल्या मियामी मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या हय़ुबर्ट हुरकाझने एकेरीचे जेतेपद मिळविताना इटलीच्या सिनेरचा पराभव केला.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 26 व्या मानांकित हुरकाझने सिनेरचा 7-6 (7-4), 6-4 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. एटीपी मास्टर्स टूरवरील हुरकाझचे हे पहिलेच विजेतेपद आहे. या स्पर्धेत हुरकाझने चार सीडेड टेनिसपटूंचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.