वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स 1000 दर्जाच्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या इगा स्वायटेकने ग्रीसच्या मारिया सॅकेरीचा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले.
20 वर्षीय स्वायटेकने अंतिम सामन्यात सॅकेरीचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्स्मध्ये फडशा पाडला. या जेतेपदामुळे आता स्वायटेकने डब्ल्युटीए टूरवरील महिलां टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. स्वायटेकने डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेतील सलग दुसरे विजेतेपद मिळविले आहे.