पोलादपूरनजीक कार 50 फूट खोल कोसळून खेडचे 3 जखमी : यमगर्णीनजीक कार अपघातात रत्नागिरीचे तिघे जखमी
प्रतिनिधी / खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरहद्दीतील धामणदेवीनजीक कार सुमारे 50 फूट खोल कोसळून तिघेजण किरकोळ जखमी झाले. तर दुसऱया घटनेत निपाणीतील यमगर्णीनजीक महामार्गावर कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात रत्नागिरीतील तिघे व नांदेडमधील एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. या दोन्ही घटनेत कारचे मोठे नुकसान झाले.
कृतिका दिगंबर शिंदे (42), प्रकृती दिगंबर शिंदे (24), जया सावंत (80, तिघेही पुरे बुद्रुक–खेड) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारार्थ कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.
महामार्गावर कारचा टायर फुटून चौघे जखमी
निपाणीतील यमगर्णीनजीक महामार्गावर कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात रत्नागिरीतील तिघे व नांदेडमधील एकजण जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. या अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात कारचालक राहुल सदावर्ते (47), वर्षा सदावर्ते (45), रुद्र सदावर्ते (18, सर्व रा. रत्नागिरी), कांचन सावंत (34, रा. नांदेड) हे चौघे जखमी झाले. कार क्रमांक (एमएच 04 डीवाय 661) ही कार रत्नागिरीहून बेळगावच्या दिशेने जात होती. महामार्गावर यमगर्णीनजीक आल्यानंतर कारचा टायर फुटल्याने कारने दुभाजकाला जोराची धडक दिली. यात कारच्या पुढील भागाचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले. यात चौघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना अपचारासाठी रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांचन व रुद्र सदावर्ते यांना मोठी दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातप्रकरणी अधिक तपास ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार करीत आहेत.