नवी दिल्लीः युपेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा परिणाम बांधकाम साहित्याच्या किमतीवर दिसून येत असून पोलादाच्या किमतीत वाढ झाली आहे. ग्राहकांसह बिल्डर पोलादाच्या किंमत वाढीमुळे चिंतेत सापडले आहेत.
बांधकाम क्षेत्रातील हालचाली वाढल्याने पोलादाची मागणी ही अलीकडच्या काळामध्ये बऱयापैकी वाढलेली दिसली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये पोलादाच्या (हॉट रोल्ड कॉइल)किमती या 68 हजार ते 69 हजार रुपये प्रतिटन इतक्मया होत्या. त्याच्या मागच्या आठवडय़ामध्ये याच किंमती 65 हजार 500 ते 66 हजार 500 रुपये प्रति टन इतक्या होत्या.