नवी दिल्ली
स्थानिक बाजारात पोलादाच्या किंमती वाढल्या असून याच्या आयात शुल्कात घट करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समजते. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगातील कंपन्यांना पोलाद हा महत्त्वाचा घटक ठरतो आहे. भारतात गेल्या काही दिवसात कच्च्या पोलादाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्योजकांच्या उत्पादन खर्चावर जाणवत आहे. त्यांचा खर्च वाढतो आहे. हाच विचार करून सरकार आयात शुल्क शून्यावर आणायचा विचार करत आहे. ठराविक कच्च्या पोलादाच्या वस्तूंवर पूर्णपणे आयात शुल्क माफ करण्याचा विचारही पुढे येतो आहे.