नवी दिल्ली
गेल्या 10 दिवसात पोलादाच्या किंमती वाढल्या असल्याचे दिसून आले असून याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावरही जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 10 दिवसात पोलादाच्या किंमती टनामागे 2 हजार रुपयांनी वाढल्या आहेत. पोलादाच्या स्थानिक मागणीत झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरामुळे किंमतीत वाढ करणं अपरिहार्य होतं, असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर पडणार असून बांधकाम खर्च परिणामी वाढणार आहे.