मुंबई
आर्थिक वर्ष 2021 मध्ये पोलाद मागणीत 13 ते 15 टक्के इतकी घट दिसणार असल्याचा अंदाज क्रिसील या संस्थेने नुकताच वर्तविला आहे. लॉकडाऊनच्या कारणामुळे सध्याला पोलादाच्या मागणीवर परिणाम दिसून येत आहे. लॉजिस्टीक्स, बांधकाम प्रकल्प, पायाभूत सुविधांचे प्रकल्प लॉकडाऊनच्या कारणास्तव बंद असल्यामुळे बाजारात पोलाद मागणीला उठाव दिसला नाही. तिसऱया तिमाहीत पोलाद मागणीत वाढ दिसेल असा अंदाज 60 टक्के तज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचा दबाव मात्र विक्रीवर राहणार आहे.