गुह्यासाठी पोलीस निरीक्षकालाही घातली टोपी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योsजक दीपक गद्रे यांच्याकडे 20 लाख रूपयांची खंडणी मागणाऱयांना नुकतीच न्यायालयाने शिक्षा ठोठावल़ी पालघर येथे पोलिसांचेच खबरी म्हणून हे आरोपी काम करत होत़े दरम्यान पोलिसांच्या नावाचा वापर करून बक्कळ पैसे उकळता येतात, अशी खात्री पटल्याने या खबऱयांनी खंडणीचा मार्ग पत्करल़ा मात्र अखेर त्यांचे पितळ उघडे पडून शिक्षेला समोर जावे लागल़े
नरसिंग दशरथ कारभारी (28, मुळ लातूर सध्या मुंबई) व निशांत उर्फ सनी प्रवीण परमार (33, दहिसर मुंबई) अशी गुह्यामध्ये शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परमार याने 14 नोव्हेंबर 2018 रोजी उद्योजक दीपक गद्रे यांना मोबाईलवर कॉल करून आपण पालघर जिह्यातील घोळवड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पाटील बोलत असल्याची बतावणी केल़ी यावेळी आरोपीने आपण परदेशी बनावटीचे हत्यार घेवून जाणारा इसम पकडला असून तो तुमचे नाव सांगत आहे, असे गद्रे यांना सांगितल़े तसेच या प्रकरणी चौकशीसाठी तुम्हाला ताब्यात घ्यावे लागल़े एकदा अटक केली तर पुढील एक महिना तुमची सुटका होणार नाही, अशी भीती गद्रे यांच्या मनात घातल़ी मात्र आपली यातून सुटका करावयाची असल्यास 20 लाख रूपये मुंबई येथे आपण सांगू त्या ठिकाणी घेवून या, असे आरोपीने सांगितल़े
दीपक गद्रे यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना सांगितल्यानंतर हा खंडणीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आल़े या बाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली संशयित आरापीला अटक करण्यासाठी व्युहरचना करण्यात आल़ी यावेळी पोलिसांनी गद्रे यांना आरोपीबरोबर फोनवर तडजोड करण्यास सांगितल़े त्यानुसार 20 लाख रूपये एकरकमी देणे शक्य नसून 10 लाख रूपयांचा पहिला हफ्ता देण्यास आपण तयार असल्याचे गद्रे यांनी संशयित आरोपीला सांगितल़े त्यानुसार आरोपीने गद्रे यांना शुक्रवारी सकाळी पैसे ठाणे येथे घेवून येण्यास सांगितल़े
पैसे स्वीकारताना घेतले ताब्यात
खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी आपले पथक घटनास्थळी रवाना केले होत़े ठरल्या वेळेनुसार आरोपी ठाणे येथे आल़ा यावेळी आरोपीने गद्रे यांना पैशाची रक्कम घेवून येण्यास सांगितल़े दरम्यान आरापी समोर दिसताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्य़ा
गुह्यासाठी पोलीस निरीक्षकालाच घातली टोपी
आरोपी पोलिसांचे खबरी म्हणून काम करत असल्याने त्यांना पोलिसांची काम करण्याची पद्धत चांगलीच माहितीची होत़ी त्यानुसार उद्योजक दीपक गद्रे यांना थेट फोन न करता ग्रामीण पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षकांना फोन केल़ा आपण पालघर येथील पोलीस निरीक्षक बोलत असून उद्योजक दीपक गदे यांना फोन करण्यास सांगा, असे कळविल़े त्यानुसार रत्नागिरीमधील या पोलीस निरीक्षकाने गद्रे यांच्यापर्यंत हा मेसेज कळविला होत़ा आपण पोलीसच बोलत आहोत. ही खात्री पटवण्यासाठी हा कट आरोपी यांनी रचल़ा मात्र गद्रे यांनी पोलिसांतच तक्रार केल्याने आरोपींचे पितळ उघडे पडल़े