ऑनलाईन टीम / नवी मुंबई
कोरोनाने संपूर्ण देशासह राज्यात चिंतेच वातावरण असताना कोरोनास्थिती नूसार निर्णय घेतले जाणार असल्याचे माहिती राज्याचे आरोग्य मंत्री यांनी राजेश टोपे यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी पोलीसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचा गृहविभागाने पोलिसांसाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
ते म्हणाले की “आपण ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता घरुन काम करायचं आहे”. तसंच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंधांबाबत काही अतिरिक्त माहिती देण्यास नकार दिला. राज्यात आतापर्यंत ९५१० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील शाळांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता
ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येमुळे पुणे शहरातील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय घेतली जाणार आहे.