सेंटरमध्ये 50 बेडची व्यवस्था
प्रातिनिधी/रत्नागिरी
जिह्यातील पोलीस दलामध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोना बाधित कर्मचाऱयांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 54 कर्मचारी अधिकारी व त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित सापडले आहेत. जिह्यातील अशा कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱयांची काळजी घेता यावी व कोरोनाला हरवून ते या युध्दात पुन्हा सामील व्हावे यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी 50 बेडचे खास पोलिसांसाठी कोव्हिड सेंटर पोलिस मुख्यालयात सुरू केले. पोलिसांनी पोलिसांसाठी सुरू केलेला हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
आतापर्यंत जिह्यात 54 पोलीस कर्मचारी अधिकारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोव्हिड बाधित झाले आहेत. एकट्या शहर पोलीस ठाण्यातील 11 कर्मचारी बाधित झाले आहेत. कायदा व सुरक्षिततेचे काम करत असताना ही लोक नागरिकांच्या संपर्कात येत आहेत. पोलिस कर्मचारी बाधित होत असल्याने त्याचा ताण पोलिस यंत्रणेवर पडत आहे. रत्नागिरी शहर व ग्रामीण पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱयांना आरोपी तसेच तपास करण्याच्या दृष्टीने मृतदेहांचा पंचनामे करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जावे लागते यातूनही पोलिसांना संसर्ग वाढत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी कर्मचाऱयांच्या काळजीपोटी 50 बेडचे कोविड सेंटर उभे केले आहे. पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी उचलले हे पाऊल राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक . प्रवीण मुंडे हे स्वतः डॉक्टर असून त्यानी कोविडचा अनुभव स्वत घेतला आहे. अशा वेळी काय करावे व काय करू नये यांची पूर्ण कल्पना त्यांना असल्याने अनुभवाचा फायदा या लोकांना होणार आहे. आपल्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
बाधीत पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची घरच्यांपमाणे देखभाल व काळजी घेतली जाणार आहे. पोलीस कर्मचाऱयांच्या कुटुंबातील लोकांची काळजी व धीर देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे पुढे सरसावले आहेत.
महाराष्ट्रातील एक पहिलाच आगळावेगळा उपक्रम रत्नागिरी जिह्यात राबविला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना मानसिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढून ते जोमाने कामाला लागतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 50 बेडचे हे कोविड सेंटर बुधवारपासून कार्यान्वित झाले आहे. समाज कल्याण भवनातील 8 पोलीस कर्मचारी याठिकाणी शिप्ट केले जाणार आहेत. त्यांना याठिकाणी निरीक्षणाखाली काही दिवसासाठी ठेवले जाणार आहे.
Previous Articleबेंगळूर हिंसाचार प्रकरणी एसडीपीआय नेत्याला अटक
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.