बेळगाव / प्रतिनिधी :
जगभरात व देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने मास्क वापरणे कुटुंब कल्याण मंत्रालयाने बंधनकारक केले आहे. याच हेतुने केएलई ऍकडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्चच्या एनएसएस विभागाने पोलीसांसाठी मास्क व सॅनिटायझर वितरीत केले. पोलीस हे कोरोना योध्दा त्यांची सुरक्षितता महत्त्वाची असे विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी सांगितले.
त्यांच्या हस्ते माळमारूती पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्याकडे मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी डॉ. आश्विनी नरसण्णावर, एनएसएस संयोजक एस. जी. पाटील, प्रशासक डॉ. रविंद्र होनूरगर