बेळगाव येथील काही निरीक्षकांचा समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील 65 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये बेळगाव येथील काही अधिकाऱयांचाही समावेश आहे. बदल्यांच्या या प्रक्रियेमुळे काही नव्या अधिकाऱयांची बेळगावात वर्णी लागली आहे.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांची एसीबी विभागात बदली करण्यात आली असून त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर मंजुनाथ हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मार्केट पोलीस स्थानकात मल्लिकार्जुन तुळशीगेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांची उद्यमबाग पोलीस स्थानकात बदली झाली असून त्या जागेवर दिलीप निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांची बदली टिळकवाडी पोलीस स्थानकात तर टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांची शहापूर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.
येथील महिला पोलीस स्थानकातील श्रीदेवी पाटील यांची बदली डीएसबी विभागात करण्यात आली असून त्या जागेवर सुदर्शन पट्टणकुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी यांची बदली अंतर्गत सुरक्षा विभागात करण्यात आली आहे.