प्रतिनिधी/ सातारा
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या 93 वर्षीय आजीला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. मात्र आजीही नातीप्रमाणे लढवय्या निघाल्या. कोरोनावर मात करत बारा दिवसांच्या उपचारानंतर आजी तंदुरूस्त होवून घरी परतल्या आहेत.
लहान मुलींचा सांभाळ करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आई लॉकडाऊनपूर्वी साताऱयात आल्या. आईसोबत त्यांच्या 93 वर्षीय आजीही आल्या. काही दिवसांपूर्वी बंगल्यावरील पाच पोलीस कोरोना बाधित आढळले. यामध्ये अधीक्षक यांच्या स्वयंपाकीचाही समावेश होता. यामुळे पोलीस अधिक्षक सातुपते यांनी पती, आई, आजी अशी सर्वच घरातील सदस्यांची कोरोना चाचणी करून घेतली. यामध्ये आजीची टेस्ट पॉझिटिव्ह आली. वय जास्त असल्याने कुटुंबिय चिंतेत होते.
रूग्णवाहिका बंगल्यावर बोलवल्यानंतर मला केवळ खोकला आहे. कशाला हॉस्पिटलमध्ये नेताय, मला काही होत नाही असे आजी बोलत होत्या. आजींना कऱहाडच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आजींच्या प्रकृतीची चिंता सर्वांनाच होती. मात्र कोरोना सारख्या आजारावर अवघ्या बरा दिवसांत यशस्वीरित्या मात केली.
आजीचा आदर्श घ्यावा…
कोरोनामुळे लहान मुले ते तरूण, जेष्ठ सगळेच धास्तीच्या छायेत आहेत. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत. काही जण तर कोरोना झाला म्हणून मनाने खचले आहेत. असे न करता ज्या प्रमाणे तेजस्वी सातुपते यांच्या 93 वर्षीय आजीने व इतर लोकांनी कोरोनावर मात केली. यांचा आदर्श घेतला पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी धाडसाने सामोरे जाणे गरजेचे आहे.