प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांची केंद्राच्या विशेष सेवा पदकासाठी निवड झाली आहे. गडचिरोली येथील खडतर सेवेसाठी आणि त्या काळात केलेल्या विशेष कार्यसाठी त्यांना हे पदक बहाल करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्गे यांनी रत्नागिरीत येण्यापूर्वी गडचिरोली येथील नक्षलवादी भागात खडतर सेवा बजावली आहे. तेथील तरुणांनी नक्षलवादाचा मार्ग न अवलंबता भारतीय नागरिकत्वाच्या प्रवाहात यावे यासाठी त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले होते. तेथील युवकांना शिक्षण, क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्या या वैशिष्टय़पूर्ण कार्याचे कौतुक विशेष सेवा पदकाने झाले आहे. याबद्दल डॉ. गर्ग यांचे सर्वत्र अभिनंनद होत आहे.