तरुण भारत संवाद प्रतनिधी / सोलापूर
राज्याच्या गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक सुधारसेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर ठाणे शहर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीची चर्चा होती.