प्रतिनिधी / मडगाव
दक्षिण गोव्याच्या पोलीस मुख्यालय असलेल्या सीआयडी विभागातील पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोमरपंत आणि कुंकळी पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक सुभाष नाईक आज शुक्रवारी गोवा पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत.
उपनिरीक्षक कोमरपंत आणि उपनिरीक्षक नाईक यांचा हल्लींच पणजीत आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राज्य सरकारने सन्मान केला होता.