प्रतिनिधी /बेळगाव
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी म्हैसूर येथील लोकायुक्त पोलीसप्रमुख पी. व्ही. स्नेहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी गृहखात्याने ही नियुक्ती केली.
गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार हे शनिवार दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे ते पद रिक्त होणार आहे. या पदावर पी. व्ही. स्नेहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहा यापूर्वी म्हैसूरच्या अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख, सखलेशपूर, चामराजनगर, कोळ्ळेगालच्या पोलीस उपअधीक्षक म्हणूनही सेवा बजावल्या आहेत. सोमवारी त्या पदभार स्वीकारण्याची शक्मयता आहे.