मालवण/ प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग पोलीस दलातील अनेक कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
मालवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार बाबा गिरकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांची नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सुमारे ३६ पोलीस कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ‘पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन व शुभेच्छा’ या शुभेच्छा संदेशासह पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पदोन्नती दिल्या आहेत.