कोरोनाच्या धास्तीने स्थानकाबाहेरच व्यवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव वाढत चालला आहे. पोलिसांनी गुन्हेगारी प्रकरणात अटक केलेल्या दोन गुन्हेगारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानक सीलडाऊन करावे लागले. पोलीस निरीक्षकासह 14 पोलिसांना क्वारंटाईनमध्ये ठेवावे लागले. त्यामुळे पोलिसांनी आपली कार्यपद्धत बदलली आहे.
पोलीस स्थानकाचा व्यवहार सध्या स्थानकाबाहेरच सुरू आहे. आपल्या तक्रारी मांडण्यासाठी पोलीस स्थानकात येणाऱया नागरिकांसाठी बाहेरच खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. त्यांच्या तक्रारी ऐकून स्थानकाबाहेरच त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी काही पोलीस स्थानकाबाहेर तात्पुरत्या शेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
खडेबाजार पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला पुणे पोलिसांनीही ताब्यात घेतले होते. पुण्याहून बेळगावला आणण्यापूर्वी त्याची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रवेशद्वारावरच खुर्च्या मांडून पोलिसांनी कामकाज सुरू केले आहे.
नागरिकांसाठी समोरच्या शेडमध्ये व्यवस्था करण्यात आल्या आहेत. छोटी मोठी भांडणे व किरकोळ प्रकारात फोनवर संपर्क साधून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्हय़ातच पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची धास्ती वाढल्यामुळे वरि÷ांच्या सूचनेनुसार ही व्यवस्था करण्यात आली आहे.
याचा फायदा अनेक गुन्हेगारांना होत आहे. सध्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील दोन कच्च्या कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे किरकोळ स्वरुपाच्या गुन्हय़ात अटक करून त्या गुन्हेगारांना कारागृहात पाठवू नका, अशी विनंती कारागृह अधिकाऱयांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. छोटय़ामोठय़ा गुन्हय़ातही जर गुन्हेगारांची अटक होऊ लागली तर कारागृहात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळेच गंभीर स्वरुपाच्या गुन्हय़ातच गुन्हेगारांना अटक करण्यात यावी, अशी विनंतीही कारागृह प्रशासनाने केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आला आहे.