कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत रुजू
प्रतिनिधी बेळगाव
कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत रुजू झालेल्या खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांचा शुक्रवारी वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी सत्कार केला. राणी कित्तूर चन्नम्मा चौकात सत्काराचा कार्यक्रम झाला.
मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आदी अधिकारी उपस्थित होते. गेल्या दहा-बारा दिवसांपासून औषधोपचार घेऊन धीरज शिंदे यांनी कोरोनावर मात केली आहे.