तालुका पोलिसांची अशी ही माणूसकी
प्रतिनिधी/ सातारा
पोलीस म्हणलं की नको रे नको ती झंझंट, नको ती बिलामत अशी वाक्य आपोआप सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडून उमटतात.किंवा जरी दृष्टीस पडले तरी आले डिपारमेन्ट आले त्रास द्यायला असा सूर उमटतो.मात्र, या सगळ्याला फाटा देत पोलीस हा ही माणूस आहे.माणसाच्या मदतीला धावून जाणे माणसाचा स्वभाव आहे.कोरोनामुळे भूक बळी जाऊ नये याकरता सातारा तालुका पोलिसांनी कण्हेर धरण परिसरातल्या 15 कुटूंबाना साहित्य मदत केली.
पोलीस वर्दीबद्दल अनेक समज गैरसमज असतात.जेवढे वाईट तेवढं चांगले ही असतात.सातारा पोलीस दल कोरोनाला रोखण्यासाठी चांगला लढा देत आहे.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे गोरगरिबांचे हाल होऊ नयेत म्हणून सातारा तालुका पोलिसांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कण्हेर धरण परिसरातील 15 कुटूंबाना मदत केली.यावेळी हे.कॉ.राजू मुलाणी, दीपक पोळ, बबन वाघमळे, अमोल चोरगे, संकेत जाधव, सतीश वाघमळे, देवा सावळकर, परमेश्वर गायकवाड, अण्णाप्पा भगळे आदी उपस्थित होते.