बेंगळूर/प्रतिनिधी
धारवाड येथील एन. ए. मुथन्ना मेमोरियल पोलीस निवासी शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार निधी देण्यास तयार आहे, असे गृहमंत्री बसवराज बम्मई यांनी शुक्रवारी सांगितले.
दिवसभरात शाळेसंदर्भात विधानपरिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी व गृहमंत्री बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. पुढील दोन वर्षांसाठी शाळा चालविण्यासाठी आवश्यक असणारा निधी संदर्भात वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बोम्माई यांनी गृह विभागातील अधिकाऱ्यांना दिले.
कर्नाटकातील ५५ नवीन तालुक्यांच्या प्रशासकीय व इतर खर्चासाठी महसूल विभागाने १.४५ कोटी रुपये जाहीर केले आहेत. शासकीय आदेशानुसार सन २०१७-१८ पासून तयार झालेल्या ५४ तालुक्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये अनुदान तर कोडगू जिल्ह्यातील कुशलनगर तालुक्याला १० लाख रुपयांचे विशेष अनुदान मिळणार आहे.