प्रतिनिधी /सातारा :
पोलीस परेड ग्राऊंडवर पोलीसांसाठी उभारण्यात आलेल्या चैतन्य ऑक्सिजन हॉस्पिटलमधून दोघांना शनिवारी डिसचार्ज देण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या. पुढील दहा दिवस या रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचे आवाहन सातपुते यांनी केले.
जिह्यात कोरोनाचा विळखा घट होत चालल्याने पोलीस अधीक्षक तेंजस्वी सातपुते यांनी राजपथावर पोलीस करमणूक केंद्र बाधित पोलीसांसाठी सुरू केले. गेल्या दोन महिन्यापासून हे सुरू असून तिथे ज्या बाधित पोलिसांना अधिक त्रास नाही व केवळ लक्षणे आहेत. त्यांच्यावर इथे उपचार सुरू आहेत. आता गंभीर स्थिती पोलीस कर्मचाऱयासाठी पोलीस परेड ग्राऊंडवर हॉस्पिटल उभारण्यात आले. रविवारपासून सुरू झालेल्या या हॉस्पिटलमधून अवघ्या पाच दिवसांत दोघांना डिसचार्ज मिळाला. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते स्वता: उपस्थित होत्या. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना टाळ्या वाजवून, पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सातपुते म्हणाल्या, मागच्या रविवारी चैतन्य ऑक्सिजन हॉस्पिटल या पोलीसांच्या साठीच्या हॉस्पिटलचे उद्घाटन केले होते. खूप आनंदाची गोष्ट आहेत की, अवघ्या चार-पाच दिवसांमध्ये दोन पेंशटला डिसचार्ज मिळला आहे. दोघांची प्रकृती ठिक झाल्यानंतर 6 मिनिटे त्यांची वॉकिग टेस्ट घेतली आहे. वाँकिग नंतर ही त्यांचा ऑक्सिजन लेवल 98-99 असा आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. पेंशट पूर्ण ठिक झाल्यानंतर त्यांना आता डिसचार्ज दिला आहे. पुढच्या 10 दिवस त्यांना होम आयसोलशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना डॉक्टरांनी घरीही औषधे दिली आहेत. इथे जे अत्यावश्यक पेंशट आले होते. त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांकडून तसेच सर्व टीमकडुन चांगली काळजी घेतली जात आहे.