पोलिसांकडून युवकांना चोप, काही युवक ताब्यात
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील पोवईनाका परिसरातील पोस्ट पार्सल कार्यालयानजिक असलेल्या एका बारसमोर युवकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. याबाबतची माहिती कळताच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. मारामारी करणाऱया काहींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने आता हॉटेल्स, बार यांना रात्री 12 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सातारा शहर रात्री उशिरापर्यंत सुरु असते. पोवईनाका परिसरातही रात्री उशिरा वर्दळ असते. अशाच मंगळवारी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास पोस्ट पार्सल कार्यालयानजिक असलेल्या एका बार समोर युवकांमध्ये मारामारी सुरु झाली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले. गाडय़ांची येजा सुरु असतानाच हे भररस्त्यात एकमेकांना तुडवत होते. या गोंधळाची माहिती कोणीतरी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. मारामारी करत असलेल्या काही युवकांना चोप देत त्यांनी ताब्यात घेतले. यातील काही युवकांनी पळ काढला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे हे युवक नेमके व कशासाठी मारामारी करत होते हे समोर आले नाही. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.