बांधकाम विभागासह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष, : गेल्या आठवडय़ात शिवतीर्थाच्या परिसरात घडले दहा अपघात
प्रतिनिधी / सातारा
पोवई नाक्यावर कोटय़ावधी रुपयांचा खर्च करुन ग्रेड सेपरेटर बांधले अन् ते पालिकेकडे हस्तारंण केले. पालिकेच्या ताब्यात ग्रेड सेपरेटर आल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून पोवई नाका परिसरात छोटे छोटे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत दहा अपघात झाले आहेत. त्यामुळे पोवई नाक्यावरचा प्रवास जीवघेणा ठरु लागला आहे. अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने पोवई नाक्यावर गाडी आणल्यावर अन्य वाहनाची आपल्याला धडक लागते काय अशी भिती वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे. बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, सातारा पालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
सातारा शहरात महत्वकांक्षी असे ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात आले. या कामामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडलेला आहे. असे असताना नव्याने झालेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहतूक जरी सुरळीत झाली असली तरीही वाहनधारक मात्र बेफामपणे वाहने आपली दामटत असल्याने किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या अपघाताच्या घटना गेल्या एका आठवडय़ात दहाच्या सुमारास दहावर गेलेला आहे. त्यामध्ये अपघातांचे प्रमाण रोखायचे असेल तर त्याकडे प्रामुख्याने बांधकाम विभाग वाहतूक विभागाने याकडे लक्ष देवून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. परंतु उपाययोजना नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे.
अपघाताची संख्या कमी व्हावी जीव वाचावेत, वाहतूक कोंडी टाळावी यासाठीच ग्रेड सेपरेटर करण्यात आला आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी त्रुटी असल्याने शाहु चौकातुन येणारे वाहन हे सायली हॉटेलच्या जवळ थेट अंगावर येते. तसेच पोवई नाक्यावर शिवतीर्थाला वळसा मारतानाही स्टॅण्डकडून येणारी वाहने आणि शाहु चौकातून येणारी वाहने यांचा संगम होताना अपघात होत आहेत. तसेच वळून पुन्हा शाह्t चौकाकडे व पोलीस मुख्यालयाकडे व कराड बाजूकडून येणाऱया वाहनांची धडकाधडकी होण्याची शक्यता आहे. सिव्हीलकडे व अजिंक्य कॉलनीकडे जातानाही अपघात होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्यावतीने उपाययोजना लवकरच करणार
ग्रेड सेपरेटर हा सातारकरांसाठी महत्वकांक्षी प्रकल्प खासदार श्री.छ.उदयनराजेंनी केला आहे. सातारकरांसाठी चांगली सोय करण्यात आली आहे. ग्रेड सेपरेटरवर अपघात होत असतील आणि त्या तुमच्या निदर्शनास आल्या असतील तर आम्ही पालिकेच्यावतीने सर्व काही उपाययोजना तात्काळ करु. तेथे बोर्ड लावू, स्पीड ब्रेकर करु, असे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले.
उपाययोजना हव्याच आहेत
सातारा पालिकेने बांधलेला ग्रेड सेपरेटर चांगलाच आहे. मात्र, ग्रेड सेपरेटरवरील रस्ते चांगले असल्याने वाहनधारकांचा वाहनांचा वेग तपासला तर पहा किती आहे. त्यामुळे आपल्या वाहनांवर वाहनधारकांनी नियंत्रण ठेवले पाहिजे.
अप्पा पिलावरे सातारा आमच्याकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत
सातारा पालिकेकडून वेळोवेळी वाहतूक शाखेला मदत केली जाते. ग्रेड सेपरेटरवर वेगाने वाहने येतात त्या ठिकाणी वाहनधारकांनाच थोडेसे कमी वेगाने वाहने चालवावीत अशा आशयाचे बोर्ड लावण्यात येतील. आमच्याकडून सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी सांगितले.
बांधकामचे अभियंता फोनच उचलेनात सार्वजनिक बांधकामचे अभियंता रवीकांत आंबेकर, अहिरे हे दोन अभियंत्यांना फोनवरुन याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या दोघांनी फोन उचलला नाही. त्यामुळे स्पष्टीकरण समजू शकले नाही. दरम्यान, ग्रेड सेपरेटर होण्यापूर्वी अनेक अपघात या पोवई नाक्याने पाहिलेले आहेत.