प्रतिनिधी / सातारा :
पोवई नाका परिसरात कासट मार्केटमध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी पूर्णतः जळाली. तर दुसऱ्या एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले. आगीची एका चारचाकी वाहनालाही पुढील बाजूने झळ बसली. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, या वाहनांना आग लावली की लागली? याचा सातारा शहर पोलीस तपास करत आहेत.