बेळगाव / प्रतिनिधी
माझी मैना गावावर राहिली,
माझ्या जिवाची होतिया काहिली,
अशा दमदार पोवाडय़ातून सांगली येथील शाहीर देवानंद माळी व त्यांच्या सहकाऱयांनी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास उभा केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या पोवाडय़ातून महाराष्ट्रात पासून तातातूट झालेल्या सीमावासीयांच्या मनातील घालमेल त्याकाळी मांडली होती ती घालमेल आजही प्रत्येक सीमावासीयाच्या मनात आहे हे दाखवून देणारा हा पोवाडा उपस्थितांची वाहवा मिळवून गेला. अंगावर शहारे आणणारे पोवाडे आपल्या पहाडी आवाजाने माळी यांनी सादर करून बेळगावकरांसमोर शिवकाळ उभा केला.
सार्वजनिक वाचनालय बेळगाव आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेची बुधवारी सांगता झाली. कॅम्प येथील गोगटे रंगमंदीर येथे झालेल्या या कार्यक्रमात सांगली येथील शाहीर देवानंद माळी यांच्या पोवाडय़ांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच महिला शक्ती यावर विविध पोवाडे सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरूवात गणरायाला नमन करून व शाहीर पठ्ठे बापूराव यांना मुजरा करून झाली. धन्य धन्य शिवाजी राजा…. या पोवाडय़ातून शाहीरांनी शिवाजी महाराजांचे गुण आपल्या वाणीद्वारे मांडले. शाहीरांची पत्नी कल्पना माळी यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पोवाडा साजरा करून महिला शक्तीचे महत्व पटवून दिले. शाहीर देवानंद माळी यांनी सामाजिक संदेश देत पोलिओचा डोस दिला नाही तर अपत्याला होणारा त्रास पोवाडय़ातून मांडला.
हिंडलगा येथील व्यंकटेश देवगेकर यांनीही यावेळी पोवाडा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. शाहीर देवानंद माळी यांना तितक्मयाच तोडीची संगीत साथ मिळाली. वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
ध्वनी योजनेमुळे रसिकांचा हिरमोड
बेळगाव परिसरात पोवाडे ऐकणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे आजही पोवाडय़ांच्या कार्यक्रमांना हजारोच्या संख्येने बेळगावमध्ये उपस्थिती असते. परंतु बुधवारी मोठय़ा प्रमाणात रसिक उपस्थित असूनही ध्वनी योजनेमुळे रसिकांचा हिरमोड झाला. सभागृहात आवाज घुमत असल्यामुळे स्वत: शाहीरांनीही आपली नाराजी व्यक्त करून दाखविली.