साहित्य : अर्धी वाटी पोहे, 2 बटाटे वाफवून, 5 बेड स्लाईस, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा लिंबूरस, 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी
कृती : पोहे धुवून निथळून दहा मिनिटे तसेच ठेवावेत. बेड स्लाईसच्या कडा काढून त्याचा मधला भाग घ्यावा. त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरला लावून घ्यावे. नंतर त्यात मॅश केलेले बटाटे, लाल तिखट पावडर आणि मीठ घालून त्याचा पारीसाठी गोळा मळावा. दुसऱया बाऊलमध्ये पोहे घेऊन त्यात शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, चाट मसाला, लाल तिखट पावडर, मीठ, कोथिंबीर आणि लिंबूरस घालून मिश्रण मिक्स करावे. दोन मिनिटांनंतर त्याचे समान आठ गोळे बनवावेत. हाताला थोडेसे तेल लावून बेडच्या गोळय़ाची पारी बनवून त्यात तयार बटाटय़ाचे सारण घालून गोळा बंद करावा. त्याला हलके दाब देत कचोरी बनवून गरम तेलात खरपूस तळावी. तयार कचोरी सॉससोबत खाण्यास द्या.