साहित्य : 1 वाटी पोहे, 1 मध्यम आकाराचा बटाटा, अर्धी वाटी चीज, चवीपुरते मीठ, पाव चमचा काळीमिरी पावडर, 2 चमचे कोथिंबीर चिरून, पाव चमचा शेंगदाण्याचे कूट, दीड चमचा मोझेरिल्ला चीज, पाव वाटी मैदा, आवश्यकतेनुसार बेडक्रम्स, तेल तळण्यासाठी
कृती : बटाटा धुवून त्याचे दोन भाग करून वाफवून घ्यावे. गार झाला की सोलून मॅश करावे. पोहे धुवून निथळून दहा मिनिटे ठेवावेत. बाऊलमध्ये मॅश केलेला बटाटा, पोहे, खिसलेले चीज, मीठ, कोथिंबीर, काळीमिरी पावडर आणि शेंगदाण्याचे कूट घालून मिश्रण एकजीव करावे. मोझेरिल्ला चीजचे छोटे तुकडे करून घ्यावेत. मैद्यामध्ये पाणी मिक्स करून पेस्ट बनवावी. बेडक्रम्स ताटात घ्यावे. बटाटा-पोह्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवावेत. त्याच्या मधोमध गोलाकार खड्डा बनवून त्यात मोझेरिल्ला चीजचा छोटा तुकडा ठेवून गोळा बंद करावा. नंतर मैद्याच्या पेस्टमध्ये घोळवावे. नंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून सॉससोबत खाण्यास द्या.