उलटलेला ट्रक पाहून लोकांच्या प्रतिक्रिया
एका उलटलेल्या ट्रकचे छायाचित्र सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हातपाय गळून पडतील अशा स्थितीत एक व्यक्ती निवांतपणे मोबाइलवर बोलत असल्याचे दर्शविणारे हे छायाचित्र विशेषच आहे. खरं तर व्यक्तीच्या चेहऱयावरील स्मितहास्य आणि त्याचा निश्चिंतपणा पाहून कॉलच्या दुसऱया बाजूलला कोण असेल याची कल्पना येऊ शकते. अन्यथा कोण स्वतःचा ट्रक दुर्घटनाग्रस्त झाल्यावर इतक्या निवांतपणे पहुडलेला दिसून येऊ शकतो. याचमुळे हे छायाचित्र लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.
शाही अंदाज
हे छायाचित्र आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी शेअर केले आहे. “अशा परिस्थितीत त्याचा पहुडण्याचा शाही अंदाज सांगतोय की कॉलवर दुसऱया बाजूने कोण बोलतेय’’ असे बोथरा यांनी थट्टेच्या सुरात म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटला 5 हजारपेक्षा अधिक ट्विट्स आणि 34 री-ट्विट मिळाले आहेत. तसेच या छायाचित्रावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर मिळत आहेत.