दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱया समस्यांचे निवारण करण्याची कला मुलांमध्ये निर्माण व्हावी. तसेच नवोदित कल्पनांना क्यासपीठ मिळवून देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्यावतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्य़ातील 409 विद्यार्थ्यांनी पावसाच्या पाण्यापासून विद्युत निर्मिती, पाण्याचे नियोजन, रस्ते सुरक्षा आणि शेतकऱयांना बहुपयोगी उपकरणांचे उत्कृष्ट मॉडेल या प्रदर्शनामध्ये मांडून आपले कौशल्य दाखविले.
बेळगाव जिल्हय़ातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱया 6 वी ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन होनगा येथील जंबगी पी.यु कॉलेजमध्ये भरविण्यात आले होते.बऱयाच विद्यार्थ्याना दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या प्रत्येक वस्तुबाबत माहिती जाणून घेण्याचे औत्सुक्मय असते. काही विद्यार्थी विद्युत उपकरणे, शेतीमध्ये वापरण्यासाठी उपकरणे किंवा अन्य साहित्य तयार करून घरात वापरण्याचा प्रयत्न करीत असतात. पण हे कौशल्य दाखविण्यासाठी विद्यार्थ्याना व्यासपीठ मिळत नाही. यामुळे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्यावतीने विद्यार्थ्याना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न प्रदर्शनाच्या माध्यमातून केला आहे. विद्यार्थ्यानी तयार केलेल्या विविध प्रकल्पाची माहिती घेऊन देशभरामधून 10 लाख विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची निवड जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. यामध्ये 415 विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. पण काही विद्यार्थी गैरहजर राहिल्याने 409 विद्यार्थ्याचे प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले होते.
पावसाच्या पाण्यापासून विद्युत निर्मिती, पावसाच्या पाण्याचा साठा करून शेती, उद्यान आणि घरकामाकरीता कशाप्रकारे उपयोग करता येईल, याची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली होती. तसेच सूर्यप्रकाशापासून विद्युत निर्मिती, कचऱयाची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प, सध्या वाहतुकीच्या गर्दीमधून रूग्णवाहिकेला ये-जा करताना खूपच अडचणी निर्माण होतात. यामुळे ट्रफिक सिग्नल व चौकात रूग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देणारा प्रकल्पाची मांडणी या प्रदर्शनात प्रात्यक्षिकासह करण्यात आली होती. रस्ते सुरक्षा प्रकल्प, कचऱयाची उचल करणारी यंत्रे विद्यार्थ्यानी आपले कौशल्य वापरून तयार केली असल्याचे प्रदर्शनाच्या माध्यमातून निदर्शनास आले. शेतकऱयांना कमी कष्टात जास्त काम करण्यासाठी काही उपकरणे विद्यार्थ्यानी तयार केली होती. ही उपकरणे या प्रदर्शनात मांडली होती. औषध फवारणी करण्यासाठी शेतकऱयांना पाठीवर पंपाचे ओझे घ्यावे लागते. त्यामुळे लहान सायकलचा वापर करून एकाच वेळी चार स्पेव्दारे औषध फवारणी करण्याचा प्रकल्प निपाणी येथील विद्यार्थ्याने तयार केला होता. महामार्गाने ठिकठिकाणी वळणे असतात. पण वळणांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने समोरासमोर आल्याने अपघात घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी वाहन येताच लाल दिवा दर्शविणारी यंत्रणा आणि वळणावर वाहने पलटी होण्यासाठी धोका असल्याने स्लायडिंग व्हील बसविण्याचे मॉडेल बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विद्यार्थिनीनी मांडले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावर रोलर बसवून धावणाऱया वाहनाव्दारे विद्युत निर्मिती करण्यारे आणि घरगुती कुलर, सायक्लिंगव्दारे कपडे धुण्याची मशिन असे विविध मॉडेल विद्यार्थ्यानी तयार केले होते.
सलाईन संपताच अलार्म वाजतो. तसेच वैद्यकीय अधिकारी, नर्स आदीपैकी कुणाचाही मोबाईल क्रमांक यंत्रणेत नोंद केल्यास त्यांना मिसड् कॉल जातो. दवाखाना आणि वैद्यकीय आधिकारी, नर्स आदींना उपयोगी असे सलाईन अलार्मचे मॉडेल प्रदर्शनात मांडण्यात आले होते.रेल्वे येत असल्यास सेन्सरद्वारे रेल्वे फाटक बंद करणारे मॉडेल प्रदर्शनास होते. या प्रदर्शनावेळी जिल्हय़ातील विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
या प्रदर्शनात मांडलेल्या मॉडेलचे निरीक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, दिल्लीचे निरीक्षक आकाश कौशिक यांनी केले. 409 मॉडेलमधून 41 उत्कृष्ट मॉडेलची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात येणार आहेत. त्यानंतर हासन येथे दि. 12 फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या ठिकाणी सहभागी होणाऱया मॉडेलमधून 10 टक्के मॉडेलची निवड दिल्ली येथे आयोजित प्रदर्शनासाठी करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामधून 60 मॉडेलची निवड जपान येथील प्रदर्शनासाठी करण्यात येणार असल्याची माहिती आकाश कौशिक यांनी दिली.
अनंत कंग्राळकर