प्रतिनिधी/ म्हापसा
बार्देश तालुका भंडारी समाजानी उभारलेल्या प्रगती संकुल व अन्य एकूण आलेला खर्चाचा हिशोब अस्थायी समितीने केंद्र समितीला सादर केला मात्र समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक त्या हिशोबाबाबत आम्हाला विश्वासात घेत नाहीत त्याउलट येत्या 22 नोव्हेंबरला समाजाची बैठक बोलावून बार्देश तालुका नवीन समितीसाठी निवडणूक घेत आहे. प्रथम केंद्र समितीनी आमच्या हिशोबाला मान्यता द्यावी व नंतरच समिती निवडावी अशी मागणी भंडारी समाज बार्देश तालुक्याचे पर्यवेक्षक उल्हास अस्नोडकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी व्यासपीठावर शशिकांत घाडी, सुभाष कैठणकर, पल्लवी दाभोळकर, संजय नाईक, दीक्षा कांदोळकर, ऍड. शैलेश वेंगुर्लेकर, सदानंद कौठणकर उपस्थित होते.
हिशोबाबाबत केंद्रीय समितीचे दुर्लक्ष
हॉलचा हिशेब बार्देश तालुका कमिटी आणि केंद्रीय समिती असून त्यांच्याशी बसून हा सोडविण्याचा प्रयत्न होता. आम्ही या हिशोबाची माहिती जाणून घेण्यासाठी 14 सदस्याची अस्थायी समितीची निवड केली. व या माध्यमातून बार्देश तालुका समितीशी तसेच केंद्रीय समितीशी बसलो व प्रगती संकुलाचा हिशोब पाहिला व त्यात लक्ष घालून कसे पैसे खर्च केले याची माहिती चार्टर अकाउंटन्टला देऊन आम्ही त्यावर शिक्कामोर्तब करून तो हिशोब केंद्रीय समितीला सादर केला. त्यानंतर केंद्रीय समिती या हिशोबाबद्दल माहिती देणार अशी आम्हाला आशा होती मात्र केंद्रीय समितीनी आम्हाला हिशोबाबाबत विश्वासात न घेता आमच्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती अस्थायी समितीचे पर्यवेक्षक उल्हास अस्नोडकर यांनी दिली.
2 कोटी 38 लाखाचा हिशोब सादर
2 कोटी 38 लाखाचा हिशोब आम्ही सादर केला असल्याचे अस्नोडकर यांनी स्पष्ट केले. आज जे कुणी आरोप करीत आहे तेही त्यावेळी समितीमध्ये होते. उद्घाटन होण्यापूर्वी कुणाचीही जाब नव्हती. उद्घाटनानंतर सर्वजण बोलू लागले आहे सर्वांच्या सहीनिशी हिशोब दिला आहे. हा हिशोब म्हापसा कार्यालयातर्फे केंद्रीय समितीला दिला.
आज समाज बांधवांची म्हापशात बैठक
22 रोजी सायंकाळी 5 वा. समाजाचे देणगीदार, आश्रयदाते, शुभचिंतक आहे त्यांची संयुक्त बैठक प्रगती संकुलाकडे बोलविण्यात आल्याची माहिती श्री. अस्नोडकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व भंडारी समाज बांधवांना या बैठकीसाठी बोलवित असल्याचे ते म्हणाले.