ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभांची रणधुमाळी सुरू असताना आम आदमी पक्षाने शेअर केलेल्या व्हिडिओत दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांचा डान्स आहे. त्या डान्सच्या बॅकग्राउंडला आम आदमी पक्षाचे प्रचारगीत लावण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
याप्रकरणी दिल्ली भाजपने आम आदमी पक्षाला मानहानीची नोटीस पाठवली असून, 500 कोटी रुपयांचा दावा केला आहे.
आपने शेअर केलेल्या प्रचारगीतात एका भोजपुरी अल्बममध्ये बदल करुन त्याचा वापर करून ‘लगे रहो केजरीवाल’ हे प्रचारगीत तयार करण्यात आले आहे. त्या व्हिडिओत मनोज तिवारी दिसत आहेत. या प्रचारगीताचा बँकग्राउंड म्युझिकसह व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच आम आदमी पक्षाला मानहानीची नोटीस धाडत 500 कोटींचा दावा केला आहे.