वृत्तसंस्था/ मेलबोर्न
सोमरवारपासून येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरूषांच्या एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये भारताच्या प्रजनीश गुणेश्वरनने स्थान मिळविले.
या स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या मात्र फेरीच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रजनीशला लॅटव्हियाच्या गुलबीसकडून हार पत्करावी लागली. दरम्यान या पात्र फेरीच्या स्पर्धेत ऍलेक्स डी मिनॉर आणि मॅजेकझेक यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. दरम्यान या पात्र फेरीच्या स्पर्धेत पाच खेळाडूंनी पुढे प्रवेश मिळविला. यापैकी तीन टेनिसपटूंनी प्रमुख ड्रॉमध्ये बदली खेळाडू म्हणून वाटचाल केली. त्यामध्ये गुणेश्वरनचा समावेश झाल्याने त्याने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीत गुणेश्वरनचा सामना जपानच्या इटोशी होणार आहे. भारताच्या रामकुमार रामनाथन, सुमीत नागल आणि महिला विभागात अंकिता रैना यांचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले होते.