सुशोधिकरणाच्या कामाला आला वेग; मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सूचनेनुसार कार्यवाही सुरू; अभियंता दिलीप चित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू
सातारा शहरातील वाहतुकीचा प्रश्न मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रेड सेपरेटर उभारण्यात आलेला आहे. या ग्रेड सेपरेटर च्या सर्व प्रवेशद्वारांना ऐतिहासिक असा लुक देण्याचे प्रयोजन सातारा पालिकेचे मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांचे होते. त्यांच्या सूचनेनुसार काम सुरू करण्यात आले असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रेड सेपरेटरच्या सर्व द्वारांना ऐतिहासिक येणार आहे. हे काम सातारा पालिकेचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सातारा शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. सातारा शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी बसवलेले शहर आहे मराठ्यांची राजधानी म्हणून या शहराला ओळखले जाते. या शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करून ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. या ग्रेड सेपरेटर च्या सर्व प्रवेशद्वारांना आकर्षित असे ऐतिहासिक लुक देण्यासाठी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सूचित केले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली. शाहू चौकातून स्टॅन्ड कडे जाणाऱ्या प्रवेशद्वार स्टॅंडकडून जिल्हाधिकारी कार्यालय कराड बाजूकडे जाणाऱ्या प्रवेशद्वार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्टॅन्ड कडे जाणारे प्रवेशद्वार कराड बाजू कडून स्टॅन्ड कडे जाणाऱ्या प्रवेशद्वार, या सर्व प्रवेशद्वाराना नव्याने लुक येणार आहे ऐतिहासिक असे स्वरूप दिसणार आहे. त्याकरिता मुख्य अभियंता दिलीप दिलीप चिद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. ऐतिहासिक साताऱ्यात ऐतिहासिक असे ग्रेड सेपरेटर वाटण्याकरता आकर्षक डिझाईन बसवण्याचे काम मंगळवारी सायंकाळी सुरू होते त्यापूर्वी आणलेले हे साहित्य हुतात्मा स्मारक येथे ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रेड सेपरेटरला नव्याने ऐतिहासिक असा लुक येणार आहे हे काम प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला होत आहे. त्यामुळे सातारकरांच्या मध्ये एक उत्सुकता निर्माण झालेले आहे.