सातारा / प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी रोजी येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सकाळी 9.15 वाजता होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी निमंत्रतांशिवाय इतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.