दुबई : येथे सुरू असलेल्या 2022 च्या विश्व पॅरा ऍथलेटिक्स ग्रां प्रि स्पर्धेत बुधवारी भारताचा धावपटू प्रणव प्रशांत देसाईने पुरूषांच्या 200 मी. टी-64 प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
पुरूषांच्या 200 मी. टी-64 प्रकारात प्रणव देसाईने 24.42 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर थायलंडच्या के. डेनपुमने 25.78 सेकंदाचा अवधी घेत रौप्य तर नॉर्वेच्या हेगडेलने 27.08 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. प्रणव देसाईने यापूर्वी झालेल्या फझा ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात कोलंबियाचा संघ आघाडीवर आहे. त्यांनी सहा सुवर्णासह एकूण 13 पदके मिळविली असून थायलंड 16 पदकांसह दुसऱया तर टय़ुनिशिया 7 पदकांसह तिसऱया स्थानावर आहे. भारत 4 पदकांसह 15 व्या स्थानावर आहे.