ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील 12 दिवसांपासून ते दीर्घ कोमात असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
दिल्लीतील दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात मुखर्जी यांच्यावर उपचार सुरू आहेत. 9 ऑगस्टला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 10 ऑगस्टला त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून त्यांच्या प्रकृती आणखी खालावत गेली. ते दीर्घ कोमात असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम मुखर्जींवर उपचार करत आहे. मात्र, ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितलेे.