दाक्षिणात्य चित्रपटांमधील अभिनेत्री प्रणिता सुभाष बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. तिने दोन चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. यातील एक चित्रपट अजय देवगण याच्यासोबतचा ‘भूज ः द प्राइड ऑफ इंडिया’ आहे. तर दुसरा चित्रपट ‘हंगामा’ असून यात परेश रावल, शिल्पा शेट्टी आणि मिजान जाफरी कलाकार आहेत.
माझे बॉलिवूडचे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होण्याची खंत असल्याचे तिने म्हटले आहे. प्रणिताने एप्रिल महिन्यात तिसऱया बॉलिवूडपटासाठी करार केला आहे. प्रणिताने तमिळ, तेलगू चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव कमाविले आहे. बॉलिवूडमध्येही जम बसविण्याच्या दृष्टीने ती पावले टाकत आहे. रश्मिका मंदानाप्रमाणेच तिनेही बॉलिवूडवर लक्ष केंद्रीत केले आहे.