प्रतिनिधी/ मेढा, कुडाळ
जावली शहर संपूर्ण सातारा जिह्याचे लक्ष लागून राहिल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठय़ा फरकाच्या मताने विजय झाले असून बचाव पॅनलचा 21-0 ने पराभव झाला आहे. या निवडणुकीत माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे व कै. राजेंद्र शिंदे (भैय्या) यांच्यानंतर या निवडणुकीत शेतकरी सभासदांनी सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. हे या निकालावरून पाहायला मिळाले आहे. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या गेटसमोर गुलालाची उधळण करत, फटाक्याची आतषबाजी करत विजय उत्सव साजरा केला.
गेल्या चार वर्षापासून बंद असलेला कारखाना व त्यामुळे ऊस उत्पादक शेतकयांची होणारी ससेहोलपट यामुळे नाराज शेतकऱयांचे आपणास फायदा होईल हे ओळखून जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी या निवडणुकीत कारखाना बचाव पॅनेल उभे करून निवडणुकीत रंग भरण्याचे काम केले. प्रभावी प्रचार यंत्रणेमुळे कारखाना गटाने ही धास्ती घेतली होती. मात्र सभासदांनी एक हाती सत्ता सौरभ शिंदे यांच्या हातात दिली. हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. सर्वच्या सर्व उमेदवार हे बाराशेपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. त्यामुळे माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे, कै. राजेंद्र शिंदे यांच्याबाबत कार्यकर्त्यांची असणारी निष्ठा आजही सौरभ शिंदे यांचे पाठीशी असलेले पहावयास मिळाली.
जावळी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र कारखाना बचाव पॅनेलच्या माध्यमातून दीपक पवार यांनी सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेलला आव्हान दिले होते. रविवारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. सुमारे 52 टक्के मतदान झाले. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अपेक्षेप्रमाणे संस्थापक सहकार पॅनेलने सर्व 21 जागा जिंकून एकहाती विजय संपादन केला आहे.
मेढा येथील बाबासाहेब शिंदे आखडकर सभागृहात सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनेलचे महिला प्रतिनिधी गटातून शोभाताई प्रमोद बारटक्के, ताराबाई ज्ञानेश्वर पोफळे तर संस्था बिगर उत्पादक सभासद प्रतिनिधीमधून विठ्ठल विष्णू मोरे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 18 जागांकरिता 36 उमेदवारांनी निवडणूक लढवली. यात संस्थापक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी 1200 पेक्षाही अधिकच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.
गट क्रमांक 1 ः कुडाळमधून राजेंद्र रामचंद्र शिंदे, (2211), सौरभ राजेंद्र शिंदे ( 2179), व सुनेत्रा राजेंद्र शिंदे (2135) हे विजयी झाले आहेत तर प्रशांत नायकुडे (91 3), प्रकाश शिंदे (914) यांना मते मिळाली आहेत.
गट क्रमांक 2ः खर्शी -सायगावमधून आनंदराव सदाशिव मोहिते (2121), शांताराम रामराव पवार (2117), अंकुश यादवराव शिवणकर (2105) हे विजयी झाले आहेत तर भानुदास भोसले (914), चंद्रकांत गायकवाड (896), शिवाजी गायकवाड (887) मते मिळाली.
गट क्रमांक 3ः हुमगावमधून रामदास निवृत्ती पार्टे (2130), आनंदराव मानसिंग शिंदे (2147), प्रदीप मारुती तरडे (2122), हे विजयी झाले आहेत. तर विरोधी उमेदवार संतोष गोळे (884), मधुकर पोफळे (870), अजित शेलार (837) मते मिळाली.
गट क्रमांक 4 मेढामधून आनंदराव हरिबा जुनघरे (2144), शिवाजीराव साहेबराव मर्ढेकर (2118), बाळासो गणपत निकम (2118) हे विजयी झाले असून त्यांचे विरोधी उमेदवार सुभाष दरेकर (52), बाळकृष्ण जाधव (908), शालविंत निकम (891) मते मिळाली आहेत.
गट क्रमांक 5 महाबळेश्वरमधून रामचंद्र गणपत पार्टे (2110), जयवंत ऊर्फ नानासाहेब जनार्दन सावंत (2066), दिलीप यशवंत वांगडे (2069) हे विजयी झाले असुन महादेव दुधाने (902), चंद्रकांत ओंबळे अपक्ष (17), उत्तम शेडगे (902), गंगाराम शेलार (875,) मते मिळाली आहेत. तर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून बाळकृष्ण लक्ष्मण निकम (2213), हे विजयी झाले असून त्यांचे विरोधक राजेंद्र कांबळे (935) मते मिळाली आहेत. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून कुसुम लक्ष्मण गिरीगोसावी (2177) मतांनी विजयी झाल्या असून त्यांचे सुरेश पवार यांना (962) मते मिळाली आहेत. व इतर मागास प्रवर्गमधून विजय महादेव शेवते (2202) मतांनी विजयी झाले असून त्याचे स्पर्धक प्रशांत नायुकडे यांना (941) मते मिळाली आहेत. या संस्थापक सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवला आहे.