प्रतिनिधी/ बेळगाव
अंतर्गत सुरक्षा विभागाचे पोलीस उपअधीक्षक व बेळगावचे सुपुत्र प्रतापसिंह थोरात यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे.
प्रतापसिंह हे सध्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या बेंगळूर येथील कार्यालयात सेवा बजावत आहेत. ते 1994 बॅचचे अधिकारी असून पोलीस दलात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री पदकासाठी त्यांची निवड झाली आहे. त्यांनी यापूर्वी बिदर, बेळगाव, बळ्ळारी, कारवार, कोप्पळ येथे सेवा बजावली असून अलहिंद या दहशतवादी संघटनेच्या तामिळनाडू, कर्नाटक व केरळातील पाळेमुळे खणून काढण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.