प्रतिनिधी /वाळपई
पर्ये मतदार संघातील कार्यकर्ते आज प्रतापसिह राणे निवासस्थानी पोहोचले व त्यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी गळ घातली .यामध्ये वाळपई मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रणजीत राणे पर्ये मतदार संघ गट समितीचे अध्यक्ष रमेश पणशेकर पर्ये मतदारसंघातील माजी सरपंच व विद्यमान पंचायत सभासद नितीन शिवडेकर मोर्ले पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच सभासद सुशांत पास्ते पच सभासद रितेश नाईक ा?ग्रेस गटा समितीचे अध्यक्ष हरिश्?चंद्र मानकर यांनी त्यांना निवडणूक रिंगणात उतरण्याचा आग्रह धरला.
यावेळी त्यांच्याशी दीर्घकाळपणे चर्चा झाली. या चर्चेच्या दरम्यान त्यांनी सुरुवातीला आपण निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे सांगितले. मात्र उपस्थितांच्या आग्रहामुळे त्यांनी शेवटी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. या संदर्भाची जाहीर वाच्यता पत्रकार परिषदेत करण्यात आल्यानंतर गोव्यामध्ये एकप्रकारची खळबळ त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यासंदर्भाची वार्ता सत्तरी तालुक्मयामध्ये पसरताच एकप्रकारची खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामुळे घरांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.