विशाल कदम/ सातारा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिक्षणाला प्रारंभ केला ती शाळा म्हणजे सध्याची प्रतापसिंह हायस्कूल व त्यावेळची सातारा हायस्कूल. हे हायस्कूल एकमेव सातारा जिल्हा परिषदेकडे असून जुन्याच राजवाडयात अजूनही भरते. गतवेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार यांनी तात्कालिन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे यांनी सुमारे 40 लाखांची तरतूद केली होती. त्यानुसार त्या शाळेच्या वसतीगृहाच्या इमारतीचे नुतनीकरणाचे काम अंतिम टप्यात असून येत्या काही दिवसात शाळा तेथे हलवण्यात येण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरु आहेत. विद्यमान शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी तर काहीही करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शाळा चांगली करण्याचा विडाच उचलला आहे.
सातारा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चिमुकले पाऊले त्यांच्या लहानपणी शिक्षणासाठी उमटली आहेत. त्यांचे वडिल रामजी आंबेडकर हे नोकरीनिमित्ताने साताऱयात होते. तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा रहिवास सदरबझार परिसरात आमणे बंगला येथे होता. तेथून ते त्यावेळचे सातारा हायस्कूलला जात होते. सातारा हायस्कूलची स्थापना 1851 ला झाली. या शाळेतून अनेक नामवंत व्यक्ती घडल्या आहेत. आज त्या शाळेची गेल्या काही वर्षापासून दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. परंतु या शाळेकडे प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे तात्कालिन शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, तात्कालिन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, तात्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी भेट देवून शाळेच्या सुधारणे विषयी त्यांनी वारंवार चर्चा करुन सुमारे 40 लाख रुपयांची तरतूद केली. त्याकरता प्रत्यक्ष कार्यावाहीस सुरुवात केली. ज्यादा शिक्षकांची नेमणूक करुन मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल याकरता तशी तजवीज केली. मुख्याद्यापकही कायम स्वरुपी दिला गेला. आता प्रत्यक्षात लगतच असलेल्या वसतीगृहाच्या जुन्या इमारतीचे नुतनीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. रंगरंगोटी आणि लाईट फिटींगचे काही काम उरले आहे. सध्या शौचालयाचे काम सुरु आहे. समोरच्या पंटागणाचीही स्वच्छता जेसीबीच्या सहाय्याने लेवल करुन घेतली आहे. येत्या काही दिवसात हे हायस्कूल नव्या जागेत आणण्याकरता विद्यमान शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्याकडून तसे प्रयत्न सुरु आहेत. ते वारंवार बैठका घेवून कसल्याही परिस्थिती शाळेंचा दर्जा सुधारला गेला पाहिजे यासाठी धडपड सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे हायस्कूल नव्या ढंगात नव्या रुपात दिसणार आहे.
विद्यार्थ्यांना घडविण्यासाठीच मुख्याद्यापक देशमाने यांचे आटोकाट प्रयत्न
नुकताच एक हिंदीत ऋतिक रोशन यांचा मिशन 30 हा चित्रपट चांगलाच गाजला.त्याच चित्रपटाप्रमाणे प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याद्यापक सन्मती देशमाने यांनी या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. सर्वच विद्यार्थ्यांना त्यांना काही ना काही करुन दाखवायचे आहे. शाळेचा पटही वाढवायचा आहे. शाळेला पुन्हा नवीन उजाळा आणाण्याचे स्वप्नच त्यांनी पाहिले आहे.